पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने गडअहेरी, गडबामणी,चेरपल्ली येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार


- भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार व नगर पंचायत सभापती नारायण सिडाम यांच्या पाठपुराव्याला  यश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
लगतच्या गडअहेरी, गडबामनी व चेरपल्ली येथे पाण्याची भीषण समस्या असल्याची माहिती गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम याना  भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार व नगर पंचायत सभापती नारायण सिडाम यांनी दिली.  ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. याची  तात्काळ दखल घेत पालकमंत्री ना. आत्राम यांनी तात्काळ जीवन प्राधिकरणचे अधिकारी कोतपल्लीवार  व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी  गोडे  यांना बोलावून तिनही गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करा, आपण जिल्हा नियोजन समितीतुन तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन ही पाण्याची समस्या सोडवू . यासाठी  गावात जाऊन स्वतः पाहणी करा व तात्काळ प्रस्ताव तयार करा अशा सूचना दिल्या. 
 पालकमंत्री ना. आत्राम यांच्या सूचनेनुसार   आज  शुक्रवारी  गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता गोडे  यांनी स्वतः जाऊन पूर्ण पाहणी केली.  गावकऱ्यांशी संवाद साधला, पाण्याची पाईपलाईन कुठे आहे व कुठे नाही, कोणत्या भागात नवीन पाईपलाईनची गरज आहे तसेच कुठे व्हॉल्व पाहिजे ह्याची पूर्ण माहिती घेतली.  त्यानुसार नवीन प्रस्ताव तात्काळ बनवून पालकमंत्री ना. आत्राम यांच्या सहकार्याने   लवकरच तीनही गावातील पाण्याची समस्या सोडविण्याची हमी त्यांनी गावकऱ्यांनां दिली.  ह्यावर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.   पाहणी करतांना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता गोडे  , भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, नगर पंचायत सभापती नारायण सिडाम, नगरसेवक संजय झाडे, अभियंता मनोज रामटेके,अशोक मंथनवार व गावातील अनेक महिला पुरुष उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-07


Related Photos