मियावाकी वृक्ष लागवड पद्धती अटल आनंद वन योजना नावाने राबवणार- सुधीर मुनगंटीवार


- लवकरच यासंबंधीचे धोरण जाहीर करणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई 
: मियावाकी वृक्ष लागवड पद्धती राज्यात अटल आनंद वन योजना या नावाने राबविणार असल्याचे व लवकरच यासंबंधी चे धोरण शासन मंजूर करणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहात आज त्यांनी राज्यातील कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, वन विभागाचे प्रधान सचिव  विकास खारगे, वन विभागाचे इतर अधिकारी यांच्यासह सी आय आय, यम सी यच आई, यंग इंडियन्स, टाटा मोटर्स, क्रिसल फाऊंडेशन, इंडियन ऑइल यासह इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वृक्ष लागवड हा सर्वाचा सहज भाव झाला पाहिजे. तो जनजागृती करून निर्माण करता येईल असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, कमी जागेत अधिक वृक्ष लावून मियावाकी पद्धतीने घनदाट जंगल निर्माण करता येते. जिथे आपण 1  हेक्टर वर 1 हजार झाडे लावतो तिथे या पद्धतीने 30 हजार झाडे लावता येतात.  शहरांमध्ये जागेची कमी असते. तिथे या पद्धतीने कमी जागेत वृक्षलागवड करून जंगल निर्माण करता येईल.
कॉर्पोरेट  क्षेत्रातील मान्यवर त्रिपक्षीय करार करून  अश्या पद्धतीच्या वन विकासात सहभागी होऊ शकतात, ग्रीन सिटी, ग्रीन स्कूल, ग्रीन बिल्डिंग करून हरित शहराचे स्वप्न साकार करू शकतात.  वृक्ष लागवडीसाठी रोपे स्पॉन्सर करून, लावलेल्या रोपांना टँकरने पाणी देण्याची व्यवस्था करून ती जगवण्याची हमी घेऊन, हे वृक्ष धनुष्य ते उचलू शकतात. आपल्या सामाजिक  दायित्व निधीतून  वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे मशीन देऊ शकतात. वृक्षांना पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन व्यवस्था निर्माण करू शकतात. वन्य जीवांमुळे शेतपिकाचे नुकसान होऊ नये म्हणून  चेनलिंक फेंसिंग ची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकतात. इको टुरिझम, कांदळवन उपजीविका विकास कार्यक्रमात योगदान देऊ शकतात. या सर्व क्षेत्रात शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र येऊन खूप छान काम करू शकते, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वन विभाग भविष्यातील समृद्ध वाटचालीचा वाटाड्या

हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन लोकसहभागातून वन विभाग वृक्ष लागवडीचे जे काम करत आहे ते अतिशय अभिनंदनीय असून त्यांची ही वाटचाल महाराष्ट्राच्या समृध्द वाटचालीसाठी वाटाड्या प्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे अशी  प्रतिक्रिया  उपस्थितांनी दिली तसेच टाळ्या वाजवून वन विभागाचे कौतुक केले. 33 कोटी वृक्ष लागवडीत कॉर्पोरेट क्षेत्रातील संस्था, व्यक्ती पूर्ण ताकतीने वन विभागाच्या संकल्पात सहभागी  होतील अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली. वन विभागाच्या या अथक प्रयत्नानेच राज्य वनेत्तर क्षेत्रातील वृक्ष आच्छादनात देशात पाहिले आले आहे अशी भावना ही उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली. वन विभागाने या वेळी उपस्थितांसमोर 33 कोटी वृक्ष लागवडीची माहिती देणारे सविस्तर सादरीकरण केले.  Print


News - Rajy | Posted : 2019-06-07


Related Photos