उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली असून   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल उद्या  जूनला लागणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चाना   पूर्णविराम मिळला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१९ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षा निकाल उद्या ८ जूनला दुपारी १ वाजता लावणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते.  
www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

येथे पाहू शकाल निकाल –

maharashtraeducation.com
mahresult.nic.in
mahahsscboard.maharashtra.gov.in.

वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-07


Related Photos