लिंक फेलचा ग्राहकांना फटका, कित्येक तास रहावे लागते ताटकळत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या बॅंकांचे कामकाज इंटरनेट कनेक्टीव्हीटीद्वारे सुरू आहेत. यामुळे लिंक फेल झाल्यास कधीही बॅंकांचे कामकाज खोळंबून पडते. अशावेळी ग्राहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असून तासन्तास ताटकळत रहावे लागत आहे.
आज ७ जून रोजी गडचिरोली येथील अनेक बॅंकांमध्ये लिंक फेलचा फलक पहावयास मिळाला. काॅम्प्लेक्स परिसरातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडीयाच्या शाखेत ग्रामीण भागातून आलेले ग्राहक लिंक सुरू होण्याची वाट पाहत बसले होते. सकाळपासूनच ग्राहक कामकाजानिमित्त बॅंकेत दाखल होतात. लांब रांगेमध्ये उभे राहून आपले काम होण्याची वाट पाहत असतात. अशातच लिंक फेलमुळे अजून काही वेळ रांगेतच जात आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू होत असल्याने ग्रामीण भागातून शेतकरी खते, बियाणे खरेदीसाठी रक्कम काढण्यासाठी बॅंकेत गर्दी करीत आहेत. तसेच विविध योजनांचे लाभार्थी, कर्मचारी , विद्यार्थी आपआपले काम घेउन बॅंकेच्या रांगेत उभे राहत आहेत. मात्र या ग्राहकांना लिंक फेलमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-07


Related Photos