महत्वाच्या बातम्या

 प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथे आयुष्यमान भव भारत योजनाचे डिजीटल प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : ग्रामपंचायत तोडसा व प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 

यामध्ये आभा कार्ड ऑनलाईन कसे काढावे व आपला आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करुन आयुष्यमान भारत कार्ड चे ऑनलाईन डिजीटल डाऊनलोड करून प्रिंट काढणे. या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. व कार्डचे महत्व समजावून सांगण्यात आले. 

यावेळी वनिता कोरामी सरपंच ग्रामपंचायत तोडसा, प्रशांत आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा, रामचंद्र कोडापे ग्रामसेवक ग्रामपंचायत तोडसा, डॉ. नागोसे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत सदस्य विनोद नरोटे, सदस्या ललिता सुधीर तलांडे व गावातील नागरिक दिनेश तिम्मा, नामदेव दुर्गे, प्रविण दुर्गे, पिल्ली वैदे, माया गावडे तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos