पोलीस वाहनाच्या अपघातात उपनिरीक्षकासह ६ जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
  परेडसाठी येत असलेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन उपनिरीक्षकासह ६ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. वर्धा-आर्वी मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला.  परेडसाठी पोलिस वाहन आर्वीवरून पुलगाव-विरुळमार्गे वर्ध्याला येत होते त्यावेळेस हा अपघात झाला. जखमी ठाणेदारांसह अन्य ६ जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 



  Print






News - Wardha | Posted : 2019-06-07






Related Photos