महत्वाच्या बातम्या

 टाळ मृदंगासह वाजतगाजत निघाली अमृत कलश यात्रा


- महाकाळ येथे मेरी माटी मेरा देश कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य राबविण्यात येत असलेल्या मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत वर्धा तालुक्यातील महाकाळ येथे अमृत कलश यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांनी वाजतगाजत यात्रा काढली व घरोघरून माती व तांदुळचे संकलन केले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अभियानाच्या नोडल अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, गटविकास अधिकारी संजय पाटील, सरपंच सुरज गोहो, उपसरपंच मंगेश राऊत, व्हिएसटीएफचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रविण कुऱ्हे, विस्तार अधिकारी हेमंत देवतळे, सुनील गावंडे उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमांतर्गत सर्व गावकरी व जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी सकाळी ९ वाजता पंचप्रण शपथ घेतली व नंतर कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. मेरी माटी मेरा देश अभियानाचे महत्व डॉ. ज्ञानदा फणसे यांनी समजावून सांगितले. ब्रम्हचारी देवस्थान महाकाळ येथून कलश यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेत गावातील प्रत्येक घरातून मूठभर माती किंवा चिमूटभर तांदुळ गोळा करण्यात आले.

यावेळी कलश यात्रा दिंडीत गावातील भजन मंडळ, महिला मंडळ यांनी गावातून टाळ व मृदंग वाजवत कलश यात्रा उत्स्फूर्तपणे पूर्ण केली. या उपक्रमात गावातील सर्व नागरिक, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा तसेच ग्राम पंचायत सदस्य, सचिव सावरकर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos