उद्या मृग नक्षत्राच्या पर्वावर कोकडी येथे दमा औषधीचे वितरण


- दमा औषधी घेण्यासाठी सजगता बाळगा : वैद्यराज प्रल्हाद कावळे  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकडी  येथे उद्या ८ जून रोजी मृग नक्षत्राच्या पर्वावर  सायंकाळी सहा वाजतापासून दमा औषधीचे वितरण करण्यात येणार आहे. या औषधीचा लाभ घेण्यासाठी येतांना नागरीकांनी सजग राहुन सतर्कता बाळगण्याचे आवाहन आयुर्वेदिक दमा औषधीचे जनक वैद्यराज प्रल्हाद कावळे यांनी केले आहे.
  देसाईगंज तालुक्यातील कोकडी या गावात दमा औषधीचा लाभ घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून  दमा रुग्ण येत असल्याने या ठिकाणी नागरिकांची खुप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शासन,प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून येणाऱ्या  नागरिकांची गैरसोय होऊ नये यास्तव अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्या तरी येथे येणाऱ्यांची  संख्या पाहु जाता सर्वांपर्य॔त उपलब्ध सोयी सुविधा पुरतिलच याची कुठलीच शास्वती नसते. दरम्यान अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव येताना सर्वांनी सहकार्याची भुमिका बाळगूनच जास्तीत जास्त गरजुंना याचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केला तर सर्वांच्या सोयीचा प्रश्न निकाली काढणे सहज शक्य होईल.    येताना नागरिकांनी किमती दागिने घालून येणे टाळावे, मोबाईल, पर्स चोरांपासुन सावधानता  बाळगावी. कोणाच्याही घरी औषधी घेऊ नये, औषधीसाठी कोणालाही रुपये देऊ नये, वडसा ते कोकडी वाहतूक दर १५ किंवा  २० रुपयांपेक्षा अधिक देऊ नये, गावात, शाळा परिसरात, रस्त्यावर घान करू नये,  प्लास्टिक , उरले जेवण इत्यादीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य करावे. औषधी संपत नाही,त्यामुळे अतिघाई टाळावी, अफवांवर विश्वास ठेऊ नये, आपला जोडिदार, साथिदार, लहान मुलांशी योग्य संपर्क ठेवावा,  गर्भवती महिलांनी औषध घेण्यासाठी येऊ नये, आपल्यामुळे कामात, सेवेत मदत होईल अशिच अपेक्षा बाळगून येणाऱ्या  सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यराज प्रल्हाद कावळे यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-07


Related Photos