‘भारत’ चित्रपटाची HD लिंक व्हायरल झाल्याच्या लिंकवर हिंदुस्थानचा तुकडा पाडलेला नकाशा व्हायरल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर हा चित्रपट लिक झाल्याचा एक मेसज व्हायरल झाला आहे. गंमत म्हणून शेअर केला जाणारा मेसज अत्यंत गंभीर आहे. ज्यामध्ये ‘भारत’ची HD लिंक व्हायरल झाल्याचे म्हटले आहे आणि सोबत लिंक दिलेली आहे ,  मात्र त्या लिंक वर क्लिक केल्यास हिंदुस्थानचा नकाशा झळकतो. ज्या नकाशात हिंदुस्थानचा अविभाज्य घटक असलेला जम्मू-कश्मीरमधील पाक व्याप्त कश्मीरचा भाग पाकिस्तानशी जोडलेला दाखवला आहे. पाक व्याप्त कश्मीर हे पाकिस्तानचे दाखवण्यात आलेले असल्याने नेटकरी संतापले आहेत.
भारत चित्रपटाऐवजी भारताचा नकाशा दिसतो म्हणून काही नेटकऱ्यांनी गंमत म्हणून ही लिंक ग्रुपवर शेअर केली. मात्र या लिंकवरील हिंदुस्थानच्या नकाशाशी छेडछाड करण्यात आली असून पाकव्याप्त कश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवण्यात आल्याचे लक्षात आले आहे. ही बाब गंभीर असून आता नेटकऱ्यांनी ही लिंक पोस्ट करणाऱ्यांना हा हिंदुस्थानचा अपमान असून ही लिंक फॉरवर्ड किंवा क्लिक न करण्याची विनंती केली आहे. हिंदुस्थानचा तुकडा पाडलेला हा नकाशा geology.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. याविरोधात आता आवाज उठण्यास सुरुवात झाली आहे.
सोबत Link —> https://bit.ly/2XupdFs  ही लिंक क्लिक करण्यास सांगितली आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2019-06-07


Related Photos