पुलवामा भागात ४ दहशवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद


वृत्तसंस्था / श्रीनगर  : जम्मू आणि काश्मीरच्या  पुलवामा येथील लस्सीपोरा येथे झालेल्या चकमकीत ४ दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून ४ एके रायफली जप्त करण्यात आल्या आहेत. या परिसरात सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, अनंतनाग जिल्ह्यात ईद साजरी करण्यासाठी घरी आलेल्या प्रादेशिक सेनेच्या जवानाची दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली. 
लस्सीपोरा येथील चकमकीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ४४ राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचा विशेष कारवाई गट आणि सीआरपीएफच्या जवानांनी पुलवामामधील लस्सीपोरा भागात संयुक्त शोध मोहीम हाती घेतली होती. शोध मोहीम सुरू असतानाच परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.  दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनी परिसराला वेढा घातला आणि उत्तरादाखल गोळीबार सुरू केला. यात सुरुवातीला तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. त्यानंतर काही वेळाने आणखी एक दहशतवादी ठार झाला. परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याचा संशय आहे. याच कारणामुळे सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली आहे.    Print


News - World | Posted : 2019-06-07


Related Photos