नायक पोलिस शिपाई आणि खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
वाळूने भरलेला ट्रॅक्टर  पडकल्यानंतर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणाऱ्या मोहाडी पोलिस ठाण्यातील नायक पोलिस शिपायासह एक खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
नायक पोलिस शिपाई आशिष भास्कर तिवाडे (३४) आणि खाजगी इसम नेतराम शंकर साठवणे (३५) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार दहेगाव ता. मोहाडी येथील रहिवासी असून ४ जून रोजी मोहगाव/ दहेगाव जवळून वाहणाऱ्या सूर नदीतून ट्रॅक्टर द्वारे रेती वाहतूक करीत होता. यावेळी नापोशि आशिष तिवाडे याने ट्रॅक्टर  पकडला. यानंतर कोणतीही कायदेशिर कारवाई न करता ट्रॅक्टर  सोडण्यासाठी १० हजारांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. काल ६ जून रोजी सापळा कारवाईदरम्यान नापोशि आशिष तिवाडे याने खाजगी इसम नेतराम साठवणे याच्यामार्फत लाच स्वीकारली. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत दोघांवरही गुन्हे दाखल केले आहेत.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-06-07


Related Photos