आंध्र प्रदेशात शेतकऱ्यांसाठी अन्नदाता सुखीभव ऐवजी ऋतु भरोसा योजना


- मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डींची घोषणा 
वृत्तसंस्था / अमरावती :
  निवडणुक प्रचार काळात जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डींनी आधीच्या चंद्राबाबु नायडू सरकारची अन्नदाता सुखीभव ही योजना बंद करून गुरूवारी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची घोषणा केली आहे. त्यांनी ऋतु भरोसा ही नवी योजना जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना  १२ हजार ५०० रूपयांची मदत दिली जाणार आहे. ही योजना येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
 अन्नदाता सुखीभव ही योजना बंद केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना  दहा हजार रूपयांची मदत मिळत होती. गुरूवारी जगनमोहन रेड्डी यांनी कृषि विभागाची आढावा बैठक घेऊन काही महत्वपुर्ण निर्णय घेतले.  याबैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना   त्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत मुल्य मिळेल , यासाठी आवश्यक उपाययोजना करणयाच्या शेतकऱ्यांना   सुचना केल्या. याशिवाय त्यांनी अर्थसंकल्पात मार्केट स्टॅबलाइझेन फंडासाठी ३ हजार कोटींच्या निधीची देखील घोषणा केली. त्यांनी घेतलेल्या नव्या निर्णयांचे सर्वांकडून स्वागत केले जात आहे.  Print


News - World | Posted : 2019-06-06


Related Photos