अफवांवर विश्वास ठेवू नका , लवकरच दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करू : शकुंतला काळे


वृत्तसंस्था / पुणे :  सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका ,  लवकरच दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करू, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. ७ जून रोजी दहावीचा निकाल लागणार असल्याच्या अफवा सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांत आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी  सांगितले.
मे महिन्याअखेरीस बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर दहावीचा निकाल आज जाहीर होणार, अशी अफवा पसरली होती. दहावीच्या निकालाबाबत फिरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. तो मेसेज चुकीचा असून दहावीच्या निकालाची तारीख बोर्डाने अजून जाहीर केली नाही, असे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी सांगितलं.

www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर होऊ शकते.

येथे पाहू शकाल निकाल –

maharashtraeducation.com
mahresult.nic.in
mahahsscboard.maharashtra.gov.in.

वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.  Print


News - Rajy | Posted : 2019-06-06


Related Photos