विविध योजनाअंतर्गत बचत गटातील महिलांना रोजगाराच्या संधी : ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
शासनाच्या विविध योजनांमधून महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत  बचत गटातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास, वन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी केले. 
काल ५ जून रोजी  सुमानंद सभागृह येथे महिला आर्थिक विकास महामंडळ , गडचिरोली अंतर्गत सखी लोक संचालित साधन केंद्र,गडचिरोली द्वारा भव्य साहित्य वाटप,  महिला मेळावा व वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी  उद्घाटक म्हणुन  पालकमंत्री ना. आत्राम यांनी आपल्या भाषणातून महिलांना मार्गदर्शन केले. 
सदर कार्यक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली करिता  जिल्हा नियोजन समिती व मानव विकास मिशन गडचिरोली अंतर्गत विविध प्रकल्प प्रकल्प मंजूर झालेले आहेत. त्या माध्यमातुन  महिला बचत गटांना ,फुलवात मशीन, मायक्रो ए.टी.एम. मशीन ,मिनी राईस मिल ,शेतकरी महिलांना  अवजार बँक  ,सगुणा भात लागवड पद्धतीतील साहित्य म्हणुन टोकन यंत्र व माहिती पुस्तिकेचे विमोचन ,प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेंतर्गत शिलाई प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे ४० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व अन्नपूर्णा खानावळ येथील महिलांना त्याच्या लाभांश  म्हणुन ७२ महिलांना  धनादेश वितरण , श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्र , चामोर्शी  यांना वाटर प्रकल्प अंतर्गत   माविम मुख्यालय तर्फे  उत्कृठ कामगिरी म्हणुन १० हजार रुपयांचा धनादेश वितरण करण्यात आला . कार्यक्रमादरम्यान एकंदरीत ६०० महिला उपस्थित होत्या.  याचा लाभ जवळपास जिल्ह्यात २ हजार महिलांना होणार आहे , असे  पालकमंत्री ना. आत्राम  यांनी सांगीतले .पहिल्या टप्प्यात सखी लोक संचालित साधन केंद्र गडचिरोली यांची वार्षिक आमसभा घेण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन  ना.राजे अम्ब्रीशराव महाराज अत्राम  यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ,  जिल्हा परिषद अध्यक्षा योगीताताई भांडेकर होत्या.  प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा  योगीताताई पिपरे , नगरसेवक  प्रमोद  पिपरे , जिल्हा नियोजन अधिकारी अनिल गोतमारे , जिल्हा कृषी अधीक्षक अनंता पोटे ,  नाबार्ड  चे  जिल्हा विकास व्यवस्थापक  चौधरी , माविम च्या  वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांताताई मिश्रा ,  सखी लोक संचालित साधन केंद्र गडचिरोली च्या अध्यक्षा अश्विनी जांभूळकर , बाल विकास प्रकल्प अधिकारी   पंदारे ,  प्रतिभा चौधरी , ऑक्सिजन मायक्रो ए.टी.एम.नागपूर चे  विदर्भ हेड धीरज दोतोंडे ,  फुलवात मास्टर प्रशिक्षक अश्विन जयस्वाल  आदी  उपस्थित होते.  
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सखी लोक संचालित साधन केंद्र, गडचिरोली चे व्यवस्थापक रोशन नैताम व त्याची सर्व चमु आणि तेजोमय वडसा , श्रमसाफल्य चामोर्शी ,जीवनज्योती वैरागड ,दीपज्योती धानोरा ,ज्ञानदीप आरमोरी  संगम अहेरी व संघर्ष जिमलगट्टा या सर्व लोक संचालित साधन केंद्र यांनी  यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कांताताई मिश्रा यांनी केले तर संचालन प्रविण काळबांधे  यांनी केले.  आभार  NULM  च्या  क्षेत्र समन्वयक कांचन कुळमेथे  यांनी मानले .  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-06


Related Photos