पर्यावरण संरक्षणाकरीता सामुहिक प्रयत्नाची गरज


- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचे प्रतिपादन 
- कुरखेडा येथे लोकसहभागातून विविध उपक्रम 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे पर्यावरणाला पोहचणाऱ्या हानीमूळे मानवी जिवन कठीण बनत चालले आहे.  आज ही एक जागतिक समस्या ठरलेली आहे.  सर्वांचा सामुहिक प्रयत्नाने यावर उपाय योजणा होण्याची गरज आहे असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यानी केले. 
जागतिक पर्यावरण दिनानिमीत्य   ५ जून रोजी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के बोलत होते.  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय सिंचाई अभियंता मनोहर कुंभारे शाखा अभियंता महेश कारगुंलवार,  वनव्यवस्थापन समीती सदस्य सिराज पठाण , क्षेत्र साहायक के बी उसेंडी,  ए आर दासरवार,  डी झेड हेपट, लेखापाल बी व्ही खंडाते , आर आर नंदनवार,  वनरक्षक सपना वालदे,  नारनवरे, बोरकूटे, नाकाडे, शिवरकर, धात्रक, तुलावी, गोटा, लाडे, खोबरागडे आदि उपस्थित होते.  यापूढे मार्गदर्शन करताना सोनटक्के यानी सांगीतले की,  वनपरिक्षेत्र कूरखेडा अंतर्गत जगंलातील पक्षाना कडक उन्हात पीण्याचा पाण्याची सोय व्हावी म्हणून जगंलात ठिकठिकाणी पक्षीय विहाराची व्यवस्था तसेच वृक्ष लागवटीला प्रोत्साहण मिळावे  म्हणून सीड्स बाॅल ही नाविण्यपूर्ण कल्पणा निधी उपलब्ध नसतानाही लोकसहभागातून राबविण्यात येत असल्याची माहीती त्यानी दिली.  यावेळी वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे शहरातील मुख्य रस्त्यावर रमज़ान ईद व प्रर्यावरण दिना निमीत्य शरबत वितरणाचा कार्यक्रम सूद्धा राबविण्यात आला.  कार्यक्रमाचे संचालन पी आर लाडे यानी तर आभार  एस एस धात्रक यानी मानले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-06


Related Photos