गडबोरी येथील नऊ महिन्याच्या बालकाला पळवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही :
तालुक्यातील गडबोरी येथील एका घरात घुसून रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने स्वराज सचिन गुरनुले या नऊ महिन्याच्या बालकाला झोपेतून उचलून पळविले होते. त्यात स्वराजचा मृत्यू झाला. अखेर काल रात्री ११ वाजताच्या सुमारास स्वराज ला पळवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे .  मागील चार दिवसांपासून वनविभाग त्याच्या मागावर होता व गावात गस्तही वाढविली होती. बुधवारी रात्री अखेरीस तो वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकला. रविवारी  या बिबट्याने घरात शिरून आपल्या आईजवळ झोपलेल्या एका नऊ महिन्याच्या बालकाला उचलून नेले होते व त्याची शिकार केली होती. क्षेत्र सहाय्यक बुले, वनरक्षक वैद, वनरक्षक राजश्री नागोसे, शेख, पोलीस पाटील एस.पी. अगडे आदींनी ही कारवाई केली.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-06


Related Photos