महाराष्ट्रासह दोन राज्यात येत्या काही दिवसात वादळी वार्‍यासह पाऊस : हवामान खात्याचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
येत्या काही दिवसात महाराष्ट्रासह छत्तीसगड मध्य प्रदेशमध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता हिंदुस्थानी हवामान खात्याने वर्तवली आहे. या तीन राज्यांसह कर्नाटक, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीतही पावसाची शक्यता विभागाने वर्तवली आहे. या राज्यांत ४०-५० किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे.
ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मणिपूर आणि त्रिपुरातही जोरदार पावसाची शक्यता विभागाने वर्तवली आहे. ईशान्येकडील राज्यात पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच राज्यात पाऊस पडल्यामुळे विदर्भातही गारवा निर्माण होईल.
तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड्या नागरिकांनाही पावासामुळे दिलासा मिळेल असे विभागाने म्हटले आहे.  Print


News - World | Posted : 2019-06-06


Related Photos