कर्ज आणखी स्वस्त होणार : रेपो रेटमध्ये कपात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता रेपो रेट ६ टक्क्यांवरून ५. ७५ टक्के इतका झाला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने कर्ज आणखी स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पतधोरणानुसार रेपो दरात पाव टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे ६ टक्के असणारा रेपो दर आता ५. ७५ टक्के इतका राहणार आहे. आरबीआयकडून करण्यात आलेल्या रेपो दरातील कपातीमुळे आता बँकांकडून मिळारी कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे घर खरेदी, वाहन खरेदीला चालना मिळण्याची शक्यता आहे. घर कर्जावरील व्याजदर कमी झाल्यास सर्वसमान्य नागरिकांना त्याचा मोठा फायदा होईल.
तसेच रिव्हर्स रेपो दर हा ५. ५०  टक्के तर बँक रेट  ६ टक्के इतका राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
रेपो रेट म्हणजे काय ?
रेपो रेट हा तो दर असतो ज्या दराने देशातील बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेतात
रेपो रेट वाढला तर बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होते
रेपो रेट कमी झाला तर बँकेला स्वस्तात पैसे मिळतात
रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यायच्या कर्जाचे दरही वाढवावे लागतात  Print


News - Rajy | Posted : 2019-06-06


Related Photos