सॅमसंगची ६ - जी सेवा आणण्याची तयारी


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  जगभरात अद्याप ५ जी सेवा सुरूही झालेली नसताना दक्षिण कोरियातील सर्वात मोठी कंपनी सॅमसंगने ६ जी सेवा आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलचे नेटवर्क आणखी वेगवान होणार आहे. कंपनीने सेऊल येथे यासाठीचे संशोधन केंद्रही स्थापन केले आहे. या केंद्रात डेव्हलपमेंट फर्म सुरू करण्यात आले असून सॅमसंग रिसर्च ऍडव्हान्स सेल्युलर तंत्र विकासासाठी काम करणार आहे. त्यासाठी संशोधकांची एक टीम नव्याने नेमण्यात आली आहे.
जगभरात सध्या ४ जी नेटवर्क सर्वत्र वापरले जात आहे. ५ जी नेटवर्क सुरू झाले असले तरीही काही देशात अद्याप ही सेवा प्राथमिक स्तरावरच आहे. अशा परिस्थितीत कंपनीने ६ जी नेटवर्क तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. हे कंपनीच्या दूरदर्शी तंत्रज्ञान व्यवसायाचा एक भाग मानला जात आहे. ६ जी नेटवर्कमुळे ग्राहकांना ५ जी पेक्षाही वेगवान नेटवर्क मिळू शकणार आहे.   Print


News - World | Posted : 2019-06-06


Related Photos