राजस्थान सरकारच्या बैठकीत पॉवर प्रेझेंटेशन सुरू असताना अचानक सुरु झाली पॉर्न फिल्म


वृत्तसंस्था / जयपूर : राजस्थान सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या बैठकीत  स्क्रीनवर पॉवर प्रेझेंटेशन सुरू असताना अचानक पॉर्न फिल्म सुरू झाली. या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. पंधरा सेकंद हा पॉर्न व्हिडीओ सुरू होता. काय करावे कोणालाही सुचेना . अखेर अधिकाऱ्यांनी काही तासासाठी बैठकच रद्द केली. दरम्यान, अन्न व पुरवठा विभागाच्या सचिवांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागातर्फे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सर्व जिल्हयातील अधिकारी उपस्थित होते. विभागाने जिल्हास्तरीय पातळीवर केलेल्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात येत होता. विभागाच्या सचिव मुग्धा सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक सुरू होती. एका भल्या मोठ्या स्क्रिनवर सरकारने अन्न व पुरवठा विभागाशी संबंधित केलेल्या कामांचे व्हिडीओ व फोटो दाखवण्यात येते होते. एक अधिकारी लॅपटॉपवरून हे प्रेझेंटेशन स्क्रिनवर देत होता. सगळेच जण गांभीर्याने हा व्हिडीओ व फोटो पाहत होते. त्याचवेळी अचानक स्क्रिनवर पॉर्न व्हिडीओ दिसू लागला. यामुळे सिन्हा यांच्यासह सगळेचजण अचंबित झाले. पंधरा सेकंद हा पॉर्न व्हिडीओ स्क्रीनवर दिसत होता. काय करावे कोणालाच सुचत नव्हते. शेवटी सिन्हा यांनी बैठक रद्द करत असल्याचे जाहीर केले व सगळेजण सभागृहाबाहेर पडले.
दरम्यान, अधिकारी लॅपटॉपवर प्रेझेंटेशन करत असताना स्क्रिनवर एक पॉपअप जाहीरात झळकत होती. अधिकाऱ्याने चुकून त्यावर क्लिक केले आणि पॉर्न व्हिडीओ सुरू झाला असे बोलले जात आहे.



  Print






News - World | Posted : 2019-06-05






Related Photos