महत्वाच्या बातम्या

 वीज उपकेंद्र कामाचे स्थितीकडे ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे लक्ष !


- सिरोंचात आढावा बैठकीत ३३ के.व्ही. संदर्भात लक्ष वेधले होते. 

- कारसपल्ली येथेही विज उपकेंद्र उभारण्यासाठी प्रस्तावित केले होते. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील विजेची समस्या हल्ल व्हावी. यासाठी या क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गत २४ आगष्ट रोजी सिरोंचा येथील आढावा बैठकीत ३३/११ के.व्ही. संदर्भात लक्ष वेधले होते व कामाचे चक्र तीव्र गतीने फिरविले, त्यामुळे निविदा आणि अन्य प्रक्रिया युद्धपातळीवर राबवून कामाला खऱ्या अर्थाने दिशा दिले आहे. 

अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील अहेरी, कमलापुर, पेरमिली, रेगुंठा व कारसपल्ली येथे ३३/११ के.व्ही. विज उपकेंद्र उभारण्यात यावे. यासाठी ना. धर्मराव बाबा आत्राम शर्थीचे प्रयत्न केले होते. प्रयत्नाला यशही आले असून सदरच्या कामाच्या यशस्वितेसाठी गंभीर व काळजीपूर्वक ना. धर्मराव बाबा आत्राम लक्ष घालुण आहेत. 

आदिवासी उपयोजने अंतर्गत (TSP) सदरच्या कामांसाठी अंदाजीत किंमत ३२ लक्ष रु. असून सध्यस्थितीत राज्यशासना तर्फे १३ कोटी रुपये विद्युत महावितरण कंपनीकडे वितरित केले आहे. एकंदरीत राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील अहेरी, पेरमिली, रेगुंठा, कमलापुर, कारसपल्ली येथील ३३/११ के.व्ही. विज उपकेंद्र त्वरित उभारुण या भागातील विजेची समस्या दूर करण्यासाठी विज उपकेंद्रासाठी कामाला मंजूरी, निधी उपलब्धता व कामाची खरी मुहूर्तमेढ़ रोवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos