पर्यावरण रक्षणार्थ हवा सर्वांचाच हातभार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रा. प्रमोद मशाखेत्री / मुल :
सर्वत्र पर्यावरण दिवस साजरा करण्यात येईल. पण प्रत्यक्षात हा विषय किती जण कृतीत उतरवणार हा एक प्रश्नच आहे. सध्या पर्यावरणाच्या  ऱ्हासामुळे जल,जमीन,जनावरे आणि जन प्रभावित झाले आहेत. मानवाकडून कळत न कळत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे झालेल्या अयोग्य कृतीमुळे नैसर्गिक परिस्थिती ढासळली आहे .आता पर्यावरण चिंतणासह सर्वांनाच कृतिशिलतेकडे वळण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
 पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भारताच्या घटनेमध्ये सुमारे दोनशे कायदेही समाविष्ठ करण्यात आले. परंतु,त्यांची अंमलबजावणी पाहिजे तशी झाली नाही. सर्व उत्तम कायदे कागदावरच राहिले आहेत. वर्षभरात हे कायदे मोडणा-यावर कारवाई होताना दिसत नाही ही शोकांतिका आहे. भुप्रदूषण,वायुप्रदुषण,जलप्रदुषण आणि ध्वनिप्रदुषण होणार नाही यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपण निसर्गाला जपले तरच निसर्ग आपणास जपणार आहे. ही पृष्वी जशी माणसांची आहे तशीच ती वृक्ष,पशू,पक्ष्यांचीही आहे. प्राचीन काळीही देशात ऋषी मुनीनी पर्यावरणाचे महत्व सांगितले हेाते. ज्या दिवसशी पुस्तकात असलेल्या पर्यावरणासंबधीच्या या गोष्टी आपण कृतीत उतरवू,त्याच दिवशी पर्यावरण दिन साजरा केल्याचे समाधान मिळू शकेल. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक आणि अजैविक (हवा-हवामान,पाणी,जमीन,सूर्यप्रकाश) घटकांचे एकमेकांशी असेलेला संबध आणि त्यांच्यातील आंतरक्रिया होय. या घटाकच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता,अन्नसाखळी तयार होते. मनुष्य पाषाणयुगात निसर्गाचे नियम पाळत होता. तेव्हा निसर्ग आणि पर्यावरण सुरक्षित होते. आज स्थिती विरोधीभासी झाली आहे. परिणामी जंगल,वन्यजीव कमी झाले. हे असेच सुरू राहीले तर सजीवच काय मानवालाही पृथ्वीवर राहणे कठीण होईल.
 अजैविक आणि जैविक घटक,त्याची आंतरक्रिया आणि एकमेकांवरील अवलंबिता मिळून परिसंस्था तयार होते. समुद्र,नद्या,जंगल,जलाशये,परिसंस्था आहेत. यातून एक अन्नसाखळी तयार होते. तिथे एक व्यवस्था (परिसंस्था)तयार होते. ती एकमेकांवर अवलंबून असते. पृथ्वी ही सूध्दा एक मेाठी परिसंस्था आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-05


Related Photos