जिल्ह्यातील तीन ठाणेदारांच्या बदल्या, गडचिरोलीच्या ठाणेदारपदी प्रदीप चौगावकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन गडचिरोली, आरमोरी, देसाईगंजसह अन्य पोलीस ठाण्यातील ठाणेदारांच्या बदल्या केल्या आहेत. या संदर्भात ३ जुन रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सिध्दानंद मांडवकर यांचे स्थानांतरण गडचिरोली येथे नियंत्रण कक्षात करण्यात आले आहे. 
गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दिवरतन गायकवाड यांचे गडचिरोली येथील जिल्हा विशेष शाखेत स्थानांतरण करण्यात आले आहे. तर गडचिरोलीच्या ठाणेदारपदी प्रदीप चौगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अजित राठोड यांचे सायबर पोलीस ठाण्यात स्थानांतरण करण्यात आले आहे. पुराडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उमेश महाले यांचे गडचिरोली येथील नियंत्रण कक्षात स्थानांतरण करण्यात आले आहे. पेंढरी उपपोलीस ठाण्यातील पोलीस  उपनिरिक्षक विजय बाळा सोमस्कर यांचे कोठी पोलीस मदत केंद्रात तर गडचिरोली येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक भागवत कदम यांचे स्थानांतरण गडचिरोली येथीलच नियंत्रण कक्षात करण्यात आले आहे.
स्थानांतरण करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपला कार्यभार सद्या कार्यरत असलेल्या दुय्यम असंधिकाऱ्यांकडे सोपवुन नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ रुजु व्हावे असेही आदेशात नमुद केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-04


Related Photos