महत्वाच्या बातम्या

 गणेश उत्सव शांततेत पार पाडावे : माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे


- गणेश मंडळ व शांतता समितीची बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गणेश उत्सवात समाजातील सलोखा, सद्भाव टिकून राहण्यासाठी व अनुचित घटना घडू नये म्हणून गणेश मंडळाने गणेश उत्सव शांतता व सुव्यवस्थेत पार पाडावे, असे प्रतिपादन भाजप महिला आघाडी प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले.

गडचिरोली पोलीस दल, पोलीस स्टेशन गडचिरोली यांची गणेश मंडळ व शांतता समितीची बैठक स्थानीक आरमोरी रोडवरील संस्कृती सभागृहांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच उपस्थित मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले. अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, तहसीलदार गणवीर, न.प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिद्दुरकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष शेडमाके, ऍड. राम मेश्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, लतीफ पठाण, शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील व गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक मिसाळ तर आभार पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos