महत्वाच्या बातम्या

 नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) लाभार्थ्यांना निधी उपलब्ध : खासदार रामदास तडस


- पंतप्रधान आवास योजना (शहरी) ६३८ लाभार्थ्यांना प्रत्येक ६० हजार रुपये प्रमाणे रु. ३ कोटी ८२ लक्ष ८० हजार नगर परिषद देवळी अंतर्गत जमा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सर्वासाठी घरे उपलब्ध करुन देण्याकरिता कार्य करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरी क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठया प्रमाणात घरकुले मंजूर झालेली आहेत. 

केंद्र शासन घरकुल मंजूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान वितरण करते. अनेकवेळा घरकुलाचे हप्ते राज्य सरकारच्या गृह निर्माण विभागातून नगर परिषदेला निधी प्राप्त होण्यास विलंब होतो. परीनामी लाभाथी वर्गांना अडचणीचा सामना करावा लागतो. घर बांधकाम प्रारंभ झाल्यापासून ते पुर्ण होईपंर्यत एका विशिष्ट कालावधीमध्ये लाभार्थी वर्गाला निधीची आवश्यकता असते. परंतु मागील आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये शहरी आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या निधी उपलब्ध झाला नाही, काही अधिकारी वर्गाच्या चुकीमुळे तसेच म्हाडा मुळे निधी प्रलंबीत होता. परंतु महायुती सरकारमध्ये याला गती मिळाली असुन सर्व नगर परिषद व नगरपंचायतला निधी उपलब्ध झाला व नगर परिषद देवळी अंतर्गत पंतप्रधान आवास योजना (शहरी) ६३८ लाभार्थ्यांना प्रत्येक ६० हजार रुपये प्रमाणे रु. ३ कोटी ८२ लक्ष ८० हजार जमा झाले असल्याचे माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.

वर्धा जिल्हयातील अनेक नगर परिषद व नगर पंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत निधी प्राप्त झाला आहे, परंतु नगर परिषद देवळी अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे अनेक लाभार्थ्यांना निधी मिळाला नाही, नगर परिषद व्दारा निधीबाबतच प्रस्ताव तसेच माझ्या वतीने महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव सादर केलेला होता, तसेच यासाठी केन्द्रीय गृहनिर्माण विभाग, मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे नगर परिषद देवळी अंतर्गत पंतप्रधान आवास योजना (शहरी) ६३८ लाभार्थ्यांना प्रत्येक ६० हजार रुपये प्रमाणे रु. ३ कोटी ८२ लक्ष ८० हजार जमा झालेले असुन लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.





  Print






News - Wardha




Related Photos