काटोल-नागपूर मार्गावर एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जात असताना १६ लाख घेऊन लुटारू पसार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी   १६ लाख रुपये घेऊन लुटारू पळून गेल्याची  घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास काटोल-नागपूर मार्गावर ताराबोडी शिवारात घडली. याप्रकरणी काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काटोल तालुक्यातील स्टेट बँक आफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी नागपुरातील एका कंपनीला आहे. या कंपनीचे दोन कर्मचारी सोमवारी सकाळी काटोल येथील शाखेत गेले. सकाळी ११ वाजता त्यांनी बँकेतून ५५ लाख रुपये घेतले. त्यानंतर दुचाकी घेऊन काटोलमधील एटीएममध्ये २२ लाख रुपये भरले. त्यानंतर ते पैशाची बॅग घेऊन पुढे एका गावात गेले. त्या गावच्या एटीएममध्ये १३ लाख रुपये भरले व शेवटचे १६ लाख रुपये मेटपांझरा येथील एटीएममध्ये भरायचे होते. त्या गावाकडे कंपनीचे कर्मचारी जात असताना काटोलपासून नागपूरच्या दिशेने पंधरा किमी अंतरावर असलेल्या ताराबोडी शिवारात समोरून तीन जण चेहरा बांधून पल्सर दुचाकीने त्यांना आडवे झाले. अचानक ब्रेक दाबावा लागल्याने पैसे घेऊन जाणारे कर्मचारी रस्त्यावर पडले. त्यानंतर लुटारू पैशाची बॅग घेऊन पळून गेले. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्यांनी त्यांचा साधा पाठलागही केला नाही. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. काटोलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लुटारूंचा शोध सुरू होता.   Print


News - Nagpur | Posted : 2019-06-04


Related Photos