यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झाला सर्वात जास्त खर्च


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : १७  व्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएने प्रचंड बहुमत मिळवत नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.  दरम्यान सेंटर फॉर मीडिया स्टडीने (सीएमएस) दावा केला आहे की यंदाच्या निवडणुकीत  तब्बल ६० हजार कोटींचा चुराडा झाला आहे. 
  आतापर्यंत जगातील ही सर्वाधीक खर्च झालेली निवडणूक असल्याचा दावाही सीएमएसने केला  आहे. ६० हजार कोटींपैकी फक्त १५ ते २० टक्के खर्च हा निवडणूक आयोगाने केला आहे, तर उर्वरित विविध पक्षांनी केला आहे. याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ३० हजार कोटींचा खर्च आला होता. पाच वर्षात हा खर्च दुप्पट झाला.
सीएमएसचे अध्यक्ष एन भास्कर राव यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी कोणत्या पद्धतीने खर्च करायचे याबाबत आपण शिकण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे खर्च करणे भीतीदायक आहेय. तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी आपल्याला काही सुधारात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. 
अहवालानुसार, प्रत्येक लोकसभा मतदारसंघावर १०० कोटींचा  खर्च करण्यात आला आहे. यातील १२ ते १५ हजार कोटी मतदारांवर खर्च झाले. जाहिरातीसाठी २० ते २५ हजार कोटी रुपये खर्च झाले, तसेच ५  ते ६ हजार कोटी वाहतुकीसाठी खर्च झाले आहेत. त्याचप्रमाणे १० ते १२ हजार कोटींचा औपचारिक खर्च आला, तर ३  ते ६ हजार कोटी अन्य कारणांसाठी खर्च झाले आहेत.   Print


News - World | Posted : 2019-06-04


Related Photos