महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१८ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१५०२ : शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचले.

१८१० : चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

१८८२ : पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.

१८८५ : कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या.

१९१९ : नेदरलंड देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.

१९२४ : गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.

१९२७ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.

१९४७ : अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.

१९४८ : निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.

१९६० : फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या शिष्टमंडळचे प्रमुख म्हणून संयुक्त राष्ट्रात आले.

१९६२ : बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९९७ : महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.

१९९९ : साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.

२००२ : दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

२००९ : रेडिओवर सलग १५ वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे सुरू असलेल्या द गायडिंग लाइट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.

२०१६ : सरकारविरोधी दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये १७ भारतीय लष्कराचे जवान ठार मारले.

१८ सप्टेंबर जन्म

५३ : ५३ ई.पूर्व : रोमन सम्राट ट्राजान यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११७)

१७०९ : ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)

१९०० : मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)

१९०५ : हॉलीवूड अभिनेत्री ग्रेटा गार्बो यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९९०)

१९०६ : हिन्दी हास्यकवी प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ – हाथरस, उत्तर प्रदेश)

१९१२ : चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक राजा नेने यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५)

१९४५ : मॅक्फि चे संस्थापक जॉन मॅक्फि यांचा जन्म.

१९५० : भारतीय अभिनेते विष्णुवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००९)

१९६८ : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी उपेंद्र राव यांचा जन्म.

१९७१ : अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म.

१८ सप्टेंबर मृत्यू

१७८३ : स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७०७)

१९९२ : भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)

१९९३ : विनोदी अभिनेते व दिग्दर्शक असित सेन यांचे निधन.

१९९५ : हिन्दी हास्यकवी, पद्मश्री प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)

१९९९ : मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन.

२००२ : साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)

२००४ : दलित साहित्याचे समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन.

२०१३ : भारतीय राजकारणी वेलियाम भरगवण यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos