महत्वाच्या बातम्या

 कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसग्रस्तांची संख्या वाढली : २४ सप्टेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / केरळ : केरळच्या कोझिकोड येथे निपाह व्हायरसचे संक्रमण वाढायला लागल्याने भीतीचे वातावरण आहे. निपाह व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या भीतीपोटी कोझिकोड येथील सर्व शैक्षणिक संस्था २४ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.

शुक्रवारी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूच्या संसर्गाच्या आणखी एका प्रकरणाची पुष्टी झाली असून एका ३९ वर्षीय पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या सहा झाली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या कार्यालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. त्यामुळे आता निपाहचे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार ८० झाली आहे. त्यात शुक्रवारी आणखी १३० जणांची भर पडली आहे.

केरळमधील निपाहच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडचे जिल्हाधिकारी ए गीता यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी कोझिकोडमधील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली होती. आता ती वाढवून २४ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे.





  Print






News - World




Related Photos