महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१७ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१६३० : बाेस्टन शहराची स्थापना झाली.

१९४८ : हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

१९५७ : मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

१९८३ : वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.

१९८८ : दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.

२००१ : सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.

१७ सप्टेंबर जन्म

१८९१ : दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०९)

१८७९ : स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)

१८८२ : महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.

१८८५ : पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)

१९०० : मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८५)

१९०६ : श्रीलंकेचे २रे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६)

१९१४ : बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २००८)

१९१५ : चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून २०११)

१९२२ : अँगोलाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९७९)

१९२९ : अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)

१९३० : व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

१९३२ : भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.

१९३७ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.

१९३८ : लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००९)

१९३९ : गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)

१९४५ : भारतीय धार्मिक गुरु भक्ति चारू स्वामी यांचा जन्म.

१९५० : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.

१९५१ : समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.

१९८६ : भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.

१७ सप्टेंबर मृत्यू

१८७७ : छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८००)

१९३६ : फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर याचं निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९५०)

१९९४ : अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १९५४)

१९९९ : हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन. (जन्म: १५ एप्रिल १९२२)

२००२ : कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन. (जन्म: २५ जुलै १९२२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos