महत्वाच्या बातम्या

 वनपाल, लिपिक व चौकीदार यांना लाचेच्या गुन्ह्यात सजा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महसुल जागेवर बोल्डर / मुरूम व गिट्टी उत्खनन करण्यास लिज मिळण्याप्रकरणी वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागणी करणारे वनपाल, लिपिक व चौकीदार यांना सजा सुनावली आहे. 

विठोबा उष्टुजी वैरागडे, वय ६५ वर्ष, नोकरी - वनपाल (वर्ग ३), यशवंत त्र्यंबक गौरशेट्टीवार, वय ६१ वर्ष, नोकरी- लिपीक (वर्ग ३) व जितेंद्र रमेश डोर्लीकर, वय ४४ वर्ष, नोकरी- डेपो चौकीदार (ईलोसे), सर्व वनपरीक्षेत्र कार्यालय तळोधी (बा), ता. नागभिड, जि. चंद्रपूर यांना लाचेच्या गुन्ह्यामध्ये सजा ठोठावली.

 विठोबा उष्टुजी वैरागडे, वय ६५ वर्ष, नोकरी - वनपाल (वर्ग ३), यशवंत त्र्यंबक गौरशेट्टीवार, वय ६१ वर्ष, नोकरी- लिपीक (वर्ग ३) व जितेंद्र रमेश डोर्लीकर, वय ४४ वर्ष, नोकरी- डेपो चौकीदार (ईलोसे), सर्व वनपरीक्षेत्र कार्यालय तळोधी (बा), ता. नागभिड, जि. चंद्रपूर यांचेविरूध्द दाखल लाचेच्या खटल्यामध्ये दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी जि.जी. भालचंद्र जिल्हा न्यायाधीश क्र. २ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, चंद्रपूर यांनी आरोपी क्र. १ यास (१) कलम ७ मध्ये ५ वर्षाची सजा व ५ हजार /- रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिणे साधा कारावास ( २ ) कलम १३(१)(ड), १३ (२) मध्ये ५ वर्षाची सजा व ५ हजार /- रू. दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास. दोन्ही सजा सोबत चालतील, आरोपी क्र. २ यास ( १ ) कलम ७ मध्ये ५ वर्षाची सजा व ५०००/- रू. दंड, दंड न भरल्यास ३ महिणे साधा कारावास (२) कलम १३ (१) (ड), १३ (२) मध्ये ५ वर्षाची सजा व ५ हजार /- रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिणे साधा कारावास. दोन्ही सजा सोबत चालतील आणि आरोपी क्र. ३ यास (१) कलम १२ मध्ये ५ वर्षाची सजा व ५ हजार /- रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिणे साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

याबाबत थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की, तक्रारदार योगेंद्र मधुकर बन्सोड यांना आरोपी गौरशेट्टीवार (लिपीक) व वैरागडे (वनपाल) यांनी तक्रारदार यांचे मौजा वाढोणा ता. नागभिड येथील महसुल जागेवर बोल्डर / मुरूम व गिट्टी उत्खनन करण्यास लिज मिळण्याप्रकरणी वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे कामाकरीता ५,हजार /- रू. लाचेची सुस्पष्ट मागणी केली. वैरागडे ( वनपाल ) यांनी स्वत: लाच रक्कम स्विकारून लाच रक्कमेतील वाटा १हजार /- रू. गौरशेट्टीवार (लिपीक) यांना देण्याकरीता आरोपी वैरागडे यांनी तक्रारदार यांना आरोपी डोर्लीकर यांना देण्यास सांगितले. तत्पुर्वी तक्रारदार हे लाचरक्कमेच्या देवाणघेवाण करीता वैरागडे (वनपाल ) यांचेकडे जात असतांना कार्यालयाचे बाहेर आरोपी डोर्लीकर (चौकीदार) यांनी वैरागडे यांना आनलेली रक्कम स्वतः स्विकारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर गौरशेट्टीवार (लिपीक) यांचेकरीता १ हजार /- रू. लाच रक्कम स्विकारली. आरोपी क्र. १ ते ३ यांनी लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने तक्रारदार यांचे कडून ५०००/- रू. लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात मिळुण आल्याने पोलीस स्टेशन नागभिड येथे १८ नोव्हेंबर २०१५ रोजी अप. क्र. ३०६६ / २०१५ कलम ७, १२, १३ (१) (ड), १५ सहकलत १३ (२) ला.प्र.का. सन १९८८ अन्वये दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणाचे तपासाअंती विठ्ठल पोचन्ना आचेवार, तत्कालीन पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. चंद्रपूर यांनी तपास पूर्ण करून दोषा. पत्र क्र. ३६ / १६ अन्वये विशेष खटला क्र. ०९/२०१६ प्रमाणे मा. विशेष न्यायालय, चंद्रपूर, जि. चंद्रपूर येथे प्रकरणत न्याप्रविष्ठ करण्यात आले होते.

सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा.सरकारी अभियोक्ता संदीप नागपूरे यांनी अतिशय मेहनतीने अभ्यासपूर्वक युक्तीवाद करून लाचखोरांना चपराक बसविणेकामी अत्यंत मोलाचे काम केलेले असुन आपल्या अशीलाची बाजू भक्कमपणे मांडली, तसचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर कार्यालयाचे प्रमुख श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उप अधीक्षक व जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात पो. हवा. अरुण हटवार यांनी काम पाहीले.

वरील निकालामुळे लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांचेवर निश्चितपणे परिणाम होईल व भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसेल. न्यायमुर्तीनी भ्रष्टाचारास आळा बसेल असा अतिशय चांगला निकाल दिलेला असल्याने सर्वसामान्य नागरीकांमध्ये निकालाबाबत चर्चा सुरू झालेली आहे. श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी जिल्ह्यातील जनतेला भ्रष्टाचारविरूध्द जास्तीत जास्त पुढाकार घेवून तक्रार देण्याचे आवाहन केलेले आहे. तरी कोणत्याही व्यक्तीस सरकारी अधिकारी / कर्मचारी कायदेशीर कामाकरीता लाचेची मागणी करीत असल्यास नागरीकांनी चंद्रपूरचे कार्यालयीन दुरध्वनी क्र. ०७१७२-२५०२५० अथवा टोल फ्री क्र. १०६४ वर संपर्क करावा.





  Print






News - Chandrapur




Related Photos