मारोडा नियतक्षेत्रातील वाघाच्या शिकार प्रकरणाातील आरोपी दीड वर्षानंतर वनविभागाच्या जाळ्यात


- दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी/ गडचिरोली  :
तालुक्यातील मारोडा नियतक्षेत्रामध्ये २ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या वाघ व जंगली डुक्कराची शिकार केल्यानंतर फरार झालेले दोन आरोपी दीड वर्षानंतर वनविभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.
 विश्वजीत  रंजीत मंडल, दिग्वीजय दशरथ मंडल दोन्ही रा.नवग्राम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मारोडा नियतक्षेत्रात वाघ व डुक्कराची शिकार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनविभागाने कॉलर आयडी असलेला वाघ व जंगली डुक्कराचा मृतदेह जप्त केला होता. याप्रकरणी ३ नोव्हेंंबर २०१७ रोजी एकंदरीत पाच आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र विश्वजीत मंडल व दिग्विजय मंडल हे फरार होते. या आरोपींना ३१ मे रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वनगुन्हा कबूल केला. यामुळे त्यांना अटक करण्यात आली. दोघांनाही १ जून रोजी चामोर्शी येथील प्रथमश्रेणी न्यायालया समोर उभे केले असता न्यायालयाने १४ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई आलापल्लीचे उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शीचे वनपरिक्षेत्रधिकारी व अधिनस्त वनकर्मचार्यांनी पार पाडली.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-03


Related Photos