राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने एमएचटी-सीईटी परिक्षेचा निकाल उद्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परिक्षेचा निकाल उद्या ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. एमएचटी-सीईटीच्या www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. सुमारे ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यी या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. कक्षाच्यावतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यामाहितीनुसार, सीईटीचा निकाल हा ३ जून रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आता ४ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. २ मे २०१९ आणि १३ मे २०१९ रोजी ही परिक्षा घेण्यात आली होती. सर्व पात्र उमेदवारांना त्यांचा स्कोअर, रॅंक आणि क्वलिफिकेशन स्टेटससह स्कोअरकार्ड पाहता येणार आहे. मात्र, त्यासाठी जन्मतारिख, रोल नंबर ही आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना जवळ बाळगणे आवश्यक आहे.



  Print






News - Nagpur | Posted : 2019-06-03






Related Photos