महत्वाच्या बातम्या

 कुंवरदेव मंदिर परिसरात होणार भव्य सभा मंडप बांधकाम : माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केली जागेची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील भापडा येथे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंवरदेव मंदिर परिसरात भव्य सभा मंडप बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी सदर मंदिर परिसरात भेट देऊन पाहणी केले.

कुंवर देव मंदिरात दरवर्षी एप्रिल महिन्यात मोठी जत्रा भरते. एटापल्ली तालुक्यात सुरजागड येथील ठाकूर देव जत्रेनंतर कुंवर देव जत्रेला खूप मोठा महत्व आहे. तीन दिवस भरणाऱ्या जत्रेला या परिसरातील ३१ गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र याठिकाणी येणाऱ्या भाविकांना पाहिजे त्याप्रमाणे सुविधा नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी भाग्यश्री आत्राम यांच्याकडे सभा मंडप बांधकाम करून देण्याची मागणी केली होती.

नुकतेच भाग्यश्री आत्राम एटापल्ली दौऱ्यावर असताना मंदिरात येणाऱ्या भाविकांची अडचण लक्षात घेऊन तात्काळ कुंवर देव मंदिरात भेट देऊन आशीर्वाद घेत परिसराची पाहणी केली. एवढेच नव्हेतर येथील कुंवर देव मंदिर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून अडचण जाणून घेतली. भाग्यश्री आत्राम यांनी लगेच सभा मंडप मंजूर करून लवकरच बांधकाम करून देण्याची ग्वाही दिली. कुंवर देव मंदिर कमिटीच्या सदस्यांनी ताईंचे आभार मानले. आता याठिकाणी लवकरच भव्य सभा मंडप बांधकाम होणार असून भाविकांची मोठी अडचण दूर होणार आहे.

या भेटी दरम्यान माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी, राकॉ चे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,राकॉचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, जारावंडीचे सरपंच सपना कोडापे, उपसरपंच सुधाकर टेकाम, येमली चे सरपंच ललिता मडावी, भापडाचे उपसरपंच राधिका पवार, भापडाचे माजी सरपंच घनश्याम नाईक, जयंद्र पवार, सरखेडाचे सरपंच वर्षा उसेंडी, गणेश वाढई, दिवाकर नाईक, राजू नाईक, हिराजी देहारी, महेंद्र पवार, कविता ठाकरे तसेच कुंवरदेव मंदिर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी बांधून दिले होते मंदिर :

एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गडी परिसरातील भाविक भापडा येथील कुंवरदेव मंदिर परिसरात आयोजित जत्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतात. मात्र त्यावेळेला या ठिकाणी सुसज्ज मंदिर नव्हते. २००४ मध्ये धर्मराव बाबा आत्राम यांनी विधानसभा निवडणूक जिंकताच स्वतःच्या आमदार निधीतून याठिकाणी सुसज्ज मंदिर बांधकाम करून दिले होते. आता परत एकदा सभा मंडप साठी भाग्यश्री पुढाकार घेत आहेत हे विशेष.





  Print






News - Gadchiroli




Related Photos