महत्वाच्या बातम्या

 नागपूरचे अजनी रेल्वे स्थानक सॅटेलाइट टर्मिनल म्हणून ४ नवीन प्लॅटफॉर्मच्या बांधकामासह विकसित होणार


- बांधकाम खर्च ४५.३३ कोटी : ३० टक्के काम पूर्ण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावरील गाड्या आणि प्रवाशांचा वाढता ताण कमी करण्यासाठी अजनी स्थानक भविष्यासाठी विकसित करण्यात येत आहे. अजनी स्थानकात सध्या ३ फलाट आहेत.  २६ कोच लांबीचे ४ नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याची योजना आहे. दुय्यम देखभाल सुविधेसह ४ नवीन स्टेबलिंग लाईन्स, ट्रेनच्या देखभालीसाठी १ नवीन पिट लाइन, यांत्रिक कामांसाठी सेवा इमारत, प्लॅटफॉर्मवर ५०० मीटर कव्हर शेड, डब्यातील पाण्याच्या सुविधा, नवीन प्रस्तावित प्लॅटफॉर्मला जोडण्यासाठी २ नवीन फूट ओव्हर ब्रिज चे बांधकाम करणार आहेत.

तर आता पर्यंत नागरी कामे, नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम, प्लॅटफॉर्मवरील कव्हरशेड, वॉशिंग पिट लाइन, स्टॅबल लाइन, कोच वॉटरिंग पाथ वे, सर्व्हिस बिल्डिंग इत्यादींसाठी सर्व कंत्राटे देण्यात आली आहेत. सर्व सेवा इमारती यांत्रिक कामे इ. पूर्ण झाली आहेत.

५८५ मीटर पैकी ५२० मीटर लांबीची वॉशिंग पिट लाइन पूर्ण झाली असून ट्रॅकला यार्डला जोडण्याचे काम सुरू आहे. ६०० मीटरपैकी ३०० मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म नाली चे काम, ४ स्टेबलिंग लाईनपैकी प्रत्येकी ४०० मीटर लांबीचे ट्रॅक जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. ओव्हरहेड इक्विपमेंट आणि इलेक्ट्रिकल निविदा देण्यात आल्या आहेत. सिग्नल आणि दूरसंचार उल्लंघनाचा अडथळा दूर करण्याचे काम सुरू आहे.

या प्रकल्पांच्या पूर्ततेमुळे, नवीन प्लॅटफॉर्ममुळे नागपूर विभागातील गाड्यांची गतिशीलता सुधारेल आणि गर्दी कमी होईल असे अजय दुबे सदस्य राष्ट्रीय रेल्वे ग्राहक सल्लागार परिषद रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली यांनी म्हंटले आहे.  





  Print






News - Nagpur




Related Photos