देशभरातील मोबाइल ग्राहकसंख्येत मार्चअखेरीस २.१८ कोटींची घट


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  देशभरातील मोबाइल ग्राहकसंख्येत   ३१ मार्च अखेरीस सुमारे ११६ कोटी नोंदवली गेली. मात्र फेब्रुवारीच्या तुलनेत त्यात २.१८ कोटींची घट झाली आहे. 'काही कंपन्यांनी मासिक किमान रीचार्जबाबत नवे नियम आखले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची सेवा खंडित करण्यात येत आहे. मोबाइल ग्राहकसंख्या घटण्यामागील हे प्रमुख कारण आहे', अशी माहिती ट्रायचे (दूरसंचार नियामक प्राधिकरण) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिली. 
व्होडाफोन आयडिया व एअरटेलची ग्राहकसंख्या मार्चअखेरीस कमी झाली आहे. मार्चअखेरीस व्होडाफोन आयडियाची ग्राहकसंख्या १.४५ कोटी तर एअरटेलची ग्राहकसंख्या १.५ कोटींनी रोडावली. दुसरीकडे, रिलायन्सच्या जिओने मात्र मार्चमध्ये ९४ लाख नवे ग्राहक जोडले, असे ट्रायच्या आकडेवारीत स्पष्ट झाले.   Print


News - World | Posted : 2019-06-03


Related Photos