मोहझरी येथील दोन सख्ख्या भावांचा उष्माघाताने मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्यातील मोहझरी  येथील दोन  सख्ख्या भावांचा उष्माघाताने मृत्यू  झाल्याची घटना आज २ जून रोजी उघडकीस आली आहे.  कालिदास भिवाजी लोनबले (५५)  आणि   तुळशीदास भिवाजी लोनबले  (५०) अशी मृतकांची नावे आहेत.  
सविस्तर वृत्त असे आहे की आरमोरी पासून २२ किलोमीटर अंतरावरअसलेल्या मोहझरी येथील दोन सख्खे काल १ मे रोजी काम करीत होते.   सध्याच्या कालखंडात उष्णतेचे प्रमाण अधिक असून त्याची झळ सर्वसामान्य खेड्यावरही पोहचत  आहे. या दोन्ही भावांना उन्हाचा प्रचंड तडाखा बसला. यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना  खाजगी डॉक्टरच्या माध्यमातून रात्री उपचार करण्यात आले. मात्र  परिस्थिती गंभीर असल्याने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र दोघांचाही मृत्यू झाला . त्यांची  घरची परिस्थिती बेताची असुन त्यांच्या पश्चात पत्नी,मुले, मुली, सून, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. यांच्या निधनाने मोहझरी गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-02


Related Photos