गडचिरोली - दिभना - मौशिखांब रस्त्याच्या दुरूस्तीकडे सा.बां. विभागाचे दूर्लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / डोंगरगाव :
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या २० किमी अंतरावर असलेल्या मौशिखांब या गावाकडे जाणाऱ्या  गडचिरोली - दिभना - मौशिखांब व गडचिरोली - विश्रामपूर या मार्गांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मात्र रस्त्यांच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष होत आहे.
दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दोन्ही मार्गांवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या सुरू आहेत. रापमला उत्तम उत्पन्न देणारे मार्ग आहेत. मात्र खडतर रस्त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. तसेच चारचाकी, दुचाकी वाहधारकही त्रस्त झाले आहेत. एकीकडे जिल्ह्यातील मुख्य रस्ते तोडून राष्ट्रीय  महामार्गाची निर्मिती सुरू आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांकडे दूर्लक्ष केले जात आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील रस्त्यांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-02


Related Photos