बदली प्रक्रीया न्यायपूर्ण करण्यात यावी : आदर्श शिक्षक समीती


- प्राथमिक शिक्षक संवर्गातील प्रश्नांबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात चर्चा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा
: प्राथमिक शिक्षक संवर्गातील अनेक प्रश्न मागील काही दिवसापासून प्रशासकीय स्तरावर प्रलंबीत आहेत.  सदर प्रश्न मार्गी लावत बदली प्रक्रीया न्यायपूर्ण करण्यात यावी अशी मागणी आदर्श शिक्षक समीती गडचिरोली च्या वतीने जि प अध्यक्षांच्या  दालनात झालेल्या चर्चेदरम्यान मुख्य कार्यपालन अधिकारी विजय राठोड़ यांच्याकडे  करण्यात आली.  याप्रसंगी जि प अध्यक्षा योगीता भांडेकर, आमदार डॉ देवराव होळी   उपस्थित होते. 
 यावेळी ३० सप्टेबंर २०१८ च्या  पटसंख्येनूसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे पदविधर शिक्षकांचे तसेच विविध कारणांनी निलंबित शिक्षकांच्या  ऑनलाईन बदली पूर्वी रीक्त असलेल्या शाळेत समायोजन करण्यात यावे , कम्पलसरी व्हकेन्सी मधून मुख्याध्यापकांना वगळण्यात यावे , आदि समस्या यथाशिघ्र निकाली काढत ऑनलाईन बदली प्रक्रीया न्यायपूर्ण करण्यात यावी अशी मागणी निवेदन व चर्चे द्वारे मुख्यकार्यपालन अधिकारी राठोड यांच्याकडे करण्यात आली. 
 समीतीच्या  वतीने उपस्थित सर्व समस्या व शंकाचे निरासन करण्याचे आश्वासन राठोड़ यानी दिले.  याप्रसंगी आदर्श शिक्षक समीतीचे राज्य कोषाध्यक्ष अनिल मुलकलवार , जिल्हाध्यक्ष लालचंद धाबेकर, कुरखेडा   तालुका कार्याध्यक्ष विलास बन्सोड,  जिल्हा संघटक महेबूब पठाण , सल्लागार एकनाथ नागपूरकर,  राजू वडपल्लीवार,  रवि गावंडे आदि उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-02


Related Photos