केम गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / खाबांडा  :
वरोरा  तालुका मुख्यालयापासुन जवळच असलेल्या केम गावात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी कमी पाऊस पडल्याने गावातील विहिरी ओस पडल्या आहेत. विहिरीत तर पाणी नाहीच पण गावात तीन बोरवेल आहेत.  या बोरवेलला सुध्दा मुबलक प्रमाणात पाणी नाही.  पहाटे चार वाजल्यापासून बोरवेल वर पाणी भरण्यासाठी महिलाच्या लाबंच लाबं रांगा दिसुन येतात . प्रसंगी भाडंण सुध्दा होते . ही बाब लक्षात घेऊन जि.प.सदस्या आसावरी देवतळे यांच्या निधीतून नव्याने बोरवेल करण्यात आले. ते सुध्दा कमी पडत आहे. ५०० हुन अधिक लोकवस्ती असलेल्या केम गावालगत एक तलाव आहे.  त्याचे खोलीकरण सुध्दा करण्यात आले.  पाण्याचा साठा निर्माण होईल व गावात मुबलक पाणी मिळेल अशी आशा होती.  पण तसे झाले नाही. तरी प्रशासनाने टंचाईग्रस्त गाावाकडे लक्ष केंद्रित करून पाण्याची सोय करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केल्या जात आहेत.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-02


Related Photos