अमेरिकेने भारताचा ‘जीएसपी’ दर्जा काढला , निर्यात केल्या जाणार्‍या वस्तूंवर अमेरिकेकडून मिळणारी करसवलत बंद होणार


वृत्तसंस्था /  वॉशिंग्टन : अमेरिकेकडून भारताला दिलेला व्यापार अग्रक्रम दर्जा अर्थात ‘जीएसपी’ (जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्स) काढून टाकल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ५ जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे. ट्रम्प यांच्या झटक्यामुळे भारतातून निर्यात केल्या जाणार्‍या वस्तूंवर अमेरिकेकडून मिळणारी करसवलत यापुढे बंद होणार आहे.
अमेरिकी उत्पादनांनाही समान संधी देण्याचे आश्वासन भारताने दिले नाही. अमेरिकी वस्तूंवर मोठा कर हिंदुस्थानात आकारला जातो. त्यामुळे आम्ही ५ अमेरिकेने भारत आणि तुर्कीला दिली होती. ही मुदत ३ मे रोजी संपली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून लवकर औपचारिक अधिसूचना जारी केली जाणार आहे.
‘जीएसपी’ प्रणालीअंतर्गत भारताकडून केमिकल. इंजिनीयरिंग, टेक्स्टाइल, ऑर्गेनिक वस्तूंची निर्यात अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर होते. ‘जीएसपी’ दर्जा काढल्यामुळे याचा निश्चित फटका बसेल असे काही तज्ञांचे मत आहे. मात्र वाणिज्य सचिव अनुप वधावन यांनी फार मोठे नुकसान भारताला होणार नाही, असे म्हटले आहे. ‘जीएसपी’ दर्जामुळे अमेरिकेकडून भारताला वर्षाला सुमारे १९ कोटी डॉलर्सची करसवलत मिळते.

‘जीएसपी’ म्हणजे काय

विकसनशील देशाच्या आर्थिक विकासासाठी अमेरिकेने १९७६ मध्ये जीएसपी प्रणाली (जनरलाइजड सिस्टम ऑफ प्रेफरन्स) सुरू केली. विकसनशील देशांमधून अमेरिकेत निर्यात होणार्‍या वस्तूंवर करसवलत दिली जात आहे.
२०१७ मध्ये सर्वात मोठा लाभार्थी देश हिंदुस्थान ठरला. भारताने ४८ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली. त्यातील ६ अब्ज डॉलर्सची निर्यातीवर अमेरिकेकडून ‘जीएसपी’अंतर्गत करसवलत मिळाली. याचा फायदा हिंदुस्थानच्या निर्यातवाढीसाठी झाला होता.

आम्ही राष्ट्रहितास प्राधान्य देऊ – वाणिज्य मंत्रालय

वाणिज्य मंत्रालयाने पत्रक काढून आपली भूमिका मांडली आहे. याप्रश्नी तोडगा काढण्याबाबत प्रस्ताव दिला होता, मात्र अमेरिकेला मान्य झाला नाही. अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाप्रमाणे हिंदुस्थान आपल्या राष्ट्रहितास प्राधान्य देईल. आम्हाला विकासाची आवश्यकता आणि चिंता आहे. आमच्या जनतेचे हित सरकारच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक संबंधांमध्ये अशा गोष्टी घडतात. ही निरंतर प्रक्रिया आहे. आम्ही अमेरिकेबरोबरचे संबंध आणखी बळकट करू, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.   Print


News - World | Posted : 2019-06-02


Related Photos