केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरात जंगी स्वागत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी   उत्साहात व ढोलताशाच्या गजरात स्वागत केले.  
 मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वात मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर गडकरी दिल्लीहून नागपुरात येणार असल्याने सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी विमानतळावर गर्दी केली होती. गडकरी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. प्रा. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ.कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ.सुधीर पारवे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी,माजी आ. अशोक मानकर, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, जिल्हा भाजपचे अरविंद गजभिये, संजय टेकाडे, महापालिकेचे सर्व नगरसेवक, जिपचे सर्व सदस्य, शहर आणि जिल्हा भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Nagpur | Posted : 2019-06-01


Related Photos