गडचिरोली आगारात एसटीचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज १ जून रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७१ व्या वर्धपान दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
खासदार अशोक  नेते,  आमदार डॉ देवराव होळी यांनी   वर्धपान दिनानिमित्त एसटी च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना   शुभेच्छा दिल्या.  यावेळी एस टी महामंडळ च्या वतीने नवनियुक्त खासदार अशोक  नेते व आरमोरी येथील शहीद विर पत्नी सुधा ज्ञानेश्वर चंदनखेडे यांचा शाल श्रीफळ व एसटी चे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री रवीन्द्र ओल्ललवार, नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, नगरसेवक प्रमोद  पिपरे,आदिवासी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश गेडाम , तालुका महामंत्री विनोद  गौरकर, किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनमोहन बंडावार,  विभाग नियंत्रक वाडीभस्मे, शेमदेव चापले व एस टी महामंडळ चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-01


Related Photos