भाजपविरोधात आम्ही ५२ खासदारच पुरेसे : राहुल गांधी


वृत्तसंस्था / दिल्ली : आपली लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे हे पक्षाशी जोडलेल्या प्रत्येकानं लक्षात ठेवावं. भाजपविरोधात आम्ही ५२ खासदारच पुरेसे आहोत, इंच-इंच लढू, असा निर्धार    काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  व्यक्त केला.  काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन केले. 
काँग्रेस संसदीय पक्षाची आज बैठक झाली. यात सोनिया गांधींची एकमतानं संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी सर्व खासदारांना राहुल गांधींनी संबोधित केलं.  लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. एकेकाळी ४०० जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ ५२ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दोन जागा कमी पडल्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदही गमावलं आहे. 'या अपयशानं खचून न जाता आपला लढा सुरूच ठेवा,' असं आवाहन राहुल यांनी खासदारांना केलं.  या देशातील गोरगरिबांसाठी, सामान्य नागरिकांसाठी काँग्रेसचा लढा सुरू आहे. धर्म, लिंग, जातीभेद या साऱ्याच्या पलीकडे काँग्रेसची विचारधारा आहे. या विचारधारेला अनुसरून संविधानाच्या रक्षणासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे,' असं ते म्हणाले. तत्पूर्वी संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सोनिया गांधींनी सर्व खासदार, मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. 

   Print


News - World | Posted : 2019-06-01


Related Photos