एल पी जी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
घरगुती गॅस सिलींडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. विना अनुदानित सिलींडरची किंमत २५ रुपयांनी वाढली असून अनुदानीत सिलींडची किंमत १ रुपये २३ पैश्यांनी वाढली आहे. देशातील सर्वाधिक मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत अनुदानित गॅस सिलींडरची किंमत ४९७ रुपये ३७ पैसे असेल. तर मुंबईत अनुदानीत सिलींडरची किंमत ४९५  रुपये इतकी असेल. कोलकात्यात सिलींडरची किंमत ५०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
या पूर्वी एक मे रोजी एलपीजी गॅस सिलींडरच्या किंमतीत वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि रुपयाची किंमत कमी झाल्याने सिलींडरच्या किंमतीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.  Print


News - World | Posted : 2019-06-01


Related Photos