महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर : बल्लारपूर वनविकास महामंडळाच्या वसाहतीत बिबट्याचा वावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : जंगल परिसरालगत असलेल्या वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) वसाहतीत व गोरक्षण वॉर्डात काही दिवसांपासून रोज बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एफडीसीएम वसाहत मध्ये झुडपी झाडे पुष्कळ प्रमाणात असून काही क्वार्टर रिक्त आहेत. तसेच सभोवती बऱ्याच भागात भिंत नसल्यामुळे वन्यप्राणी सरळ वसाहतीत व तेथून गोरक्षण वार्डात शिरकाव करीत आहे. वसाहतीच्या बाजूला वनविकास महामंडळाचे लाकूड आगार असून त्याला लागूनच जंगल आहे. अशातच सध्या या भागात बिबट्याचा वावर दिसून येत आहे. 

वनविकास महामंडळ च्या वसाहतीत व गोरक्षण वार्डात राहणाऱ्या लोकांनी याची माहिती बल्लारशाह वनपरिक्षेत्राधिकारी नरेश भोवरे यांना दिली. त्यानंतर, वनकर्मचारी बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी परिसरात दोन ट्रॅप कॅमेरे लावले असून आणखी तीन कॅमेरे लावण्यात येणार असुन वन कर्मचारी चे गस्त वाढविण्यात आले असल्याचे बल्लारशाह वन परिक्षेत्र चे वनपरिक्षेत्राधिकारी नरेश भोवरे यांनी सांगितले. आतापर्यंत या बिबट्याने बऱ्याच कुत्र्यांची शिकार केली. तो वसाहत परिसरात दिसून येत असून रस्ता ओलांडून वस्तीकडे ही येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos