देसाईगंज येथे विद्युत तारांच्या स्पर्शाने कापसाने भरलेला ट्रक जळून खाक


- लाखो रूपयांचे नुकसान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
शहरातील गादी व्यापारी जावेद हुसेनी यांचा कापूस भरून अमरावती येथून वडसा शहरात येत असलेला ट्रक विद्यूत तारांचा स्पर्श झाल्याने जळून खाक झाला आहे. या घटनेत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना आज ३१ मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे.
एमएच ४० एके ६६५५ क्रमांकाचा ट्रक अमरावती येथून कापूस भरून वडसा शहरात येत होता. बाबुराव मडावी महाविद्यालयाजवळील रस्त्याजवळून जाणाऱ्या विद्युत तारांचा ट्रकला स्पर्श झाला. ट्रकला आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. लागलीच देसाईगंज नगर परिषदेच्या अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. सोबतच ब्रम्हपुरी येथील अग्नीशमन वाहनसुध्दा दाखल झाले. अग्नीशमन वाहनांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिस, सिआरपीएफ १९१ व्या बटालियनच्या जवानांनी कमांडंट राकेश सक्सेना यांच्या मार्गदर्शनात आग विझविण्यासाठी सहकार्य केले.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-31


Related Photos