महत्वाच्या बातम्या

 गुन्हे शाखा गोंदिया पथकाकडून मोटर सायकल चोरी करणाऱ्याना दोन चोरट्यांकडून ५ मोटर सायकली हस्तगत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : स्थनिक गुन्हे शाखा गोंदिया पथकाकडून मोटर सायकल चोरी करणाऱ्याना दोन चोरट्यांकडून ५ मोटर सायकली हस्तगत करण्यात यश आले आहे. 

प्राप्त माहितीनुसार ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पथक पो.स्टे गोंदिया ग्रामीण, रावनवाडी, परिसरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग व चोरी / घरफोडी मोटार सायकल चोरी करणारे गुन्हेगार शोध घेत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की, विनायक नेवारे रा. गिरोला यांचेकडे चोरीची मोटार सायकल आहे व तो दासगांव / किन्ही परिसरात फिरत आहे. अशा माहीतीवरून स्थागुशाचे पथकाने विनायक नेवारे रा. गिरोला याचा शोध घेवून त्यास दासगांव / किन्ही परिसरातुन ताब्यात घेवुन मोटार सायकल चोरीबाबत विचारपुस केली असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणावरुन ग्राम नवेगाव, किरणापुर, लांजी सर्व जि. बालाघाट येथुन तसेच त्याचा मित्र विधीसंघर्षित बालक याचे सोबत मिळुन ग्राम लांजी ता.जि. बालाघाट (मध्यप्रदेश) येथुन तसेच पो. स्टे. रावणवाडी परिसरातून मो. सा. चोरी केल्याचे सांगितल्याने आरोपितांकडुन MP 50 MV 8810 HF DELUXE DRUM HERO COMPANY  ENGINE नं. HA1 या वर्णनाचा मोटर साईकल जप्त करण्यात आले. 





  Print






News - Gondia




Related Photos