बारावीच्या फेरपरीक्षेसाठी ३ जूनपासून करता येणार अर्ज


- अंतिम मुदत १४ जून  
- १४ जून नंतर विलंब शुल्क आकारण्यात येणार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
जुलै-ऑगस्ट २०१९  मध्ये होणाऱ्या बारावीच्या फेरपरीक्षेसाठी सोमवार, ३  जूनपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ३ ते १४ जूनपर्यंत असून त्यानंतर अर्ज करणाऱ्या  विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येईल. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत १९ जूनपर्यंत आहे.
फेरपरीक्षेचे ऑनलाइन अर्ज हे विद्यार्थ्यांनी ज्युनियर कॉलेजमार्फत भरावे, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. अर्ज भरताना बारावीच्या मुख्य परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षेची माहिती अर्जात ऑनलाइन उपलब्ध होईल. श्रेणीसुधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०१९ आणि फेब्रुवारी - मार्च २०२० या दोन परीक्षांच्या संधी आहेत. अर्ज भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याने विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य परीक्षेत नापास झालेले, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थीही फेरपरीक्षा देऊ शकतात.
अर्ज करण्यासाठी वेबसाईट
www.mahahsscboard.maharashtra.gov.in
www.mahahsscboard.in  Print


News - Rajy | Posted : 2019-05-31


Related Photos