मुदत संपणाऱ्या अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदाची पोटनिडणूक जाहिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली :  जूलै  ते सप्टेंबर  मध्ये मुदत संपणाऱ्या अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदांच्या  पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २३ जून रोजी मतदान होणार आहे. 

अहेरी तालुक्यातील  ग्रामपंचायत कुरुमपल्ली(प्रभाग क्र. 1व 2 ) येडमपल्ली (प्रभाग क्र.1 व 3 ) रेगुलवाही (प्रभाग क्र.2 व3) किष्टापूर दौड (प्रभाग क्र3) देचली (प्रभाग क्र.2 ) गोविंदगाव (प्रभाग क्र.3 ) दामंरचा (प्रभाग क्र.1 व 3) येरमनार (प्रभाग क्र.2 व 3 )आरेंदा (प्रभाग क्र 1) पल्ले (प्रभाग क्र1,2व3) वट्रा खु.स( प्रभाग क्र 2) मांडरा( प्रभाग क्र3 ) येथील निवडणूक होणार आहे.  निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी ( Returnaing Officer ) म्हणून अव्वल कारकुन जे. जी. सोरते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  पोटनिवडणूकीत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता मतदान करावे असे  तहसिलदार अहेरी  यांनी केले आहे. 

 

 निवडणूकीसाठी निवडणूकीचा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

 

- तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस  प्रसिद्ध करण्याचा दिनांक -  22/05/2019 (बुधवार)

- नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ  - 31/05/2019 (शुक्रवार) ते 06/06/2019 (गुरुवार) 

-  वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00 (दिनांक 2जून 2019 चा रविवार व दिनांक 5 जून 2019 ची सार्व सुट्टी वगळून 

-  नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ -  7 जून 2019 (शुक्रवार) वेळ स.11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत

-   नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ  - 10 जून 2019 (सोमवार) दुपारी 3.00 वाजेपर्यंत.

-  निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ - 10 जून 2019 (सोमवार) 

 दुपारी 3.00 वा. पर्यंत

-  मतदानाचा दिनांक -  23 जून 2019 स.7.30 वा. ते दुपारी 3.00 वा. पर्यंत)

-  मतमोजणीचा दिनांक -   24 जून 2019 (सोमवार)

-  निवडणूकीचा निकाल प्रसिध्द करण्याचा अंतिम  दिनांक -   27 जून 2019 ( गुरुवार )

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-31


Related Photos